निष्ठा : दोन पैलू
अॅरिस्टॉटल हा प्रकांड ग्रीक पंडित होता हे त्याच्या ग्रंथ-निर्मितीवरून चटकन कोणाच्याही लक्षात येईल. मानसशास्त्र, तर्कशास्त्र, शरीरविज्ञान, नाट्य-शोकांतिका व इतर विषयांवर त्याने लिहिलेली विद्वत्ताप्रचुर पुस्तके हे त्याच्या पांडित्याचे पुरावे म्हणून देता येतील. प्लेटोचा तो अत्यंत आवडता शिष्य. प्लेटोने “अकॅडमी’ची स्थापना करून जनतेच्या ज्ञानलालसेला जशी चालना दिली तसाच प्रयत्न अॅरिस्टॉटलने “लायसेयम’ही ज्ञानवर्धिनी संस्था निर्माण करून आपली गुरुपरंपरा …